कोश्यारींचे वर्तन पदाला न शोभणारे, राजू शेट्टींचे टीकास्त्र, केंद्र सरकारवर पक्षपाताचा आरोप

सांगली : राज्य सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, तर केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती निवारण कक्षामार्फत भरीव मदत महाराष्ट्राला द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. 

मदत देण्याबाबत केंद्र सरकार पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप शेट्टींनी केला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं वर्तन आश्चर्य वाटणारे आहे, त्या पदाला न शोभणारे आहे, अशी टीकाही राजू शेट्टी यांनी केली.

“संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं असून, शेतकऱ्यांचं 50 हजार कोटींचं नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा आणि केंद्र सरकारनेही राष्ट्रीय आपत्ती निवारण कक्षामार्फत भरीव मदत महाराष्ट्राला द्यावी, मात्र मदत देण्याबाबत केंद्र सरकार हे पक्षपातीपणा करत आहे” अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

Post a comment

0 Comments