"तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रमात दरेगावचा समावेश

खुलताबाद " 

आमदार श्री प्रशांत भाऊ बंब यांच्या मार्गदर्शनाखाली व दरेगावचे भुमीपुत्र, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री एल जी गायकवाड यांच्या पाठपुराव्यामुळे दरेगावचा तीर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश झाला.              खुलताबाद तालुक्यातील डोंगर दऱ्यात वसलेले तालुक्यातील शेवटचे गाव , या गावात पुरातन काळापासून नरसिंह महाराज  मंदिर असून, कित्येक वर्षांपासून येथे अक्षय तुर्तेयेच्या शुभ मुहूर्तावर दुसऱ्या दिवसापासून यात्रेला सुरुवात होते, हि यात्रा 6 दिवस चालते, यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून आपल्या संस्कृतीची जोपासना करण्यात येते. लोकांचे मनोरंजन करण्यासाठी यात्रेच्या प्रत्येक रात्री लोकनाट्य तमाशा आयोजित   करून,  देवाचे मुखवटे घालून सोंग काढण्यात येतात.
यात्रेच्या 5 व्या दिवशी लोकांनी देवाला विविध प्रकारचे नवस केलेले असतात त्याची एक परिपूर्ती म्हणून या दिवशी नवसाने झालेल्या मुलांना देवासमोर नाचविण्यात येते. शेवटच्या दिवशी सकाळी 6 वाजता नरसिंह महाराजांचे सोंग निघते, या वेळी या देवतावर लोक रेवड्याची उधळण करतात, गावातील युवक यावेळी मोठ्या उत्साहात सहभागी होतात. यानंतर मोठ्या प्रमाणात भाविकामार्फत सत्यनारायणाची पूजा केली जाते. या यात्रेला गावातील नागरिक, गावातील नातेवाईक , व आसपास च्या गावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात.
     अशा या पवित्र देवस्थानाचा विकास होऊन, येथे येणाऱ्या भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी , दरेगावचे भुमीपुत्र,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री एल जी गायकवाड यांच्या प्रयत्नाने तीर्थक्षेत्र विकास योजनेत नरसिंह महाराज देवस्थानाचा समावेश झाला.
     तीर्थक्षेत्र विकास योजनेत या देवस्थानाचा  " क " दर्जात समावेश झाल्यामुळे या योजनेअंतर्गत 30 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध होऊ शकतो. यातून या देवस्थानाच्या ठिकाणी विकासात्मक कामे करून येथे सर्व सोयी सुविधा उपलब्ध होऊ शकतात.
      दरेगाव या गावाचा तीर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश झाल्यामुळे , दरेगावचे सरपंच श्री जयश्री गणेश बोर्डे, कल्पतरू बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री शिवाजी गायकवाड, माजी सरपंच श्री अशोक गायकवाड, दत्तू पांडव,  राजु गायकवाड, काकासाहेब गायकवाड, रावसाहेब महाराज, कैलास पुरी, साहेबराव आण्णा, मगण गायकवाड, राजेंद्र गायकवाड, सुभाष जाधव, अंकुश गायकवाड, आयुब शहा, बाबासाहेब गायकवाड, भानुदास घोलप, किशोर दापके, कारभारी दापके, यांनी व गावातील नागरिकांनी  आनंद व्यक्त केला.

Post a comment

0 Comments