खेड आळंदीचे मा.आमदार सुरेश गोरे यांचे अचानक जाणे वेदनादायक- आमदार अॅड. राहुल कुल


निलेश जांबले
दौंड पुणे...
खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष माझे सहकारी मा. सुरेश भाऊ गोरे यांचे आज कोरोनाशी लढताना दुःखद निधन झाले.  गेले अनेक वर्षे त्यांचे आमचे जिव्हाळ्याचे संबंध होते त्यांचे अचानक जाणे अतिशय वेदनादायक आहे. 

आमदारकीच्या कारकिर्दीत त्यांनी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात विकासकामांचा डोंगर उभा केला होता, पुणे जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर आम्ही विधानसभेत एकत्रित आवाज उठवला होता. त्यांच्या रूपाने एक अत्यंत नम्र स्वभाव असलेल्या, गोरगरीब जनतेच्या समस्यांची जाणीव असणाऱ्या उमदया नेतृत्वास आज आपण मूकलो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि हा आघात सहन करण्याची शक्ती ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना देवो..  भावपूर्ण श्रद्धांजली..

Post a comment

0 Comments