सरकार भूमरेंनी उद्यान व शेतकऱ्यांसाठी आर्थिक पॅकेज द्यावे- दत्ताभाऊ गोर्डे


पैठण (प्रतिनिधी विजय खडसन)--

पैठण तालुक्यात आतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हाताशी आलेले पीक तूर, मूग, कपाशी, ऊस आदी पिके जमीन दोस्त झाली आहेत. असे असतांना आपण सरकार म्हणून शेतकरी बांधवाना हेक्टरी किती नुकसान भरपाई देणार हे सांगावे असे दत्तात्रय गोर्डे यांनी दै. सूर्योदयशी बोलतांना सांगितले. 

पुढे बोलतांना ते म्हणाले आपण गेली 25 वर्ष पैठणचे आमदार आणि आता कॅबिनेट मंत्री आहात आपल्या काळात संत ज्ञानेश्वर उद्यानाची काय अवस्था झाली आहे हे  सर्व पैठणवाशी परिचित आहेतच. आपण मुख्य सचिवांना आणून पाहणी केली या बाबत माझं व जनतेच काहीही एक म्हणणें नाही. आम्ही अजित दादा व जयंत पाटील यांना पत्र दिले. त्याचा तुम्हाला एव्हढा राग आला सरकार साहेब यात तुम्हाला राग येण्यासारखं काही नाहीचं. आपल्याला २५ वर्षाचा मोठा अनुभव आहे. आपण सरकार आहात असे आपणच म्हणता तर आपण सांगावे उद्यान पूर्व पदावर केंव्हा येईल सरकार असे दत्ता गोर्डे म्हणाले.

ब्राम्हगव्हान योजनेसाठी अजित दादा यांनी २२२ कोटी दिले, पैठण-अपेगाव प्राधिकरणासाठी पैठणचे भूमिपुत्र अशोकराव चव्हाण यांनी २५० कोटी मंजूर करून दिले. आता आपण मंत्री आहात, असा भरीव निधी उद्यानासाठी व शेतकऱ्यांसाठी केव्हा मंजूर करून घेणार. संत ज्ञानेश्वर उद्यानाचे आज जंगल झाले आहे. हे कोणाच्या कारकीर्दीत झाले हे सांगावं आणि मग पैठणच्या विकासावर बोलावे असे दत्ताभाऊ गोर्डे यांनी दै.सूर्योदयशी बोलतांना सांगितले

–-----------------------------------

ब्राव्हगव्हान सिंचन योजना 222 कोटी अजित दादा पवार यांनी मंजूर केले. पैठण-अपेगाव विकास प्राधिकरण २५० कोटी पैठणचे भूमिपुत्र अशोकराव चव्हाण यांनी मंजूर केले. पैठण-पाचोड रस्ता जागतिक बँकेच्या निधीतून चालू आहे. पैठण-अपेगाव रस्ता पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणातून करण्यात आला. आता आपण कॅबिनेट मंत्री आहात आज पैठणसाठी भरीव निधी मंजूर करावा व संत ज्ञानेश्वर उद्यान पुनर्जीवित करावे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. कारण आपण सरकार आहात सरकार!

दत्ताभाऊ गोर्डे ...

Post a comment

0 Comments