सत्तेत असताना मदरसे बंद करावेसे वाटले नाहीत का; इम्तियाज जलीलांचा भाजपला सवाल

नवी मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाचा धोका तर दुसरीकडे राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतं. अशात एमआयएम (MIM) पक्षाची पकड घट्ट करण्यासाठी पक्षात महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. 
महाराष्ट्राचे महासचिव शहानवाज खान यांना आजपासून पदभार देण्यात आला. यावेळी अनेक बड्या नेत्यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला. यावेळी खासदार इम्तियाज जलील यांनी विरोधी पक्ष भाजपवर घणाघाती टीका केली आहे.
देशात गंभीर प्रश्न असताना त्यावरून जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी भाजप, आरएसएस बजरंग दल एक सुनियोजित कट रचून देशात हिंदू, मुस्लिम असे धार्मिक प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची जहरी टीका इम्तियाज जलील यांनी यावेळी केली. एमआयएम प्रणित विद्यार्थी आघाडीच्या प्रथम वर्धापन दिनानिमीत्त नवी मुंबई कामोठमध्ये प्रशिक्षण शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.

Post a comment

0 Comments