देशात पुन्हा एकदा निर्यातीमध्ये वाढ

नवी दिल्ली : देशात जीवघेण्या अशा कोरोनाच्या संसर्गामुळे हाहाकार माजला असताना या सगळ्यात एक दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. 

कोरोनाच्या या कठीण काळात देशाची निर्यात गेल्या ६ महिन्यांपासून ढासळली होती. पण आता सप्टेंबर २०२० मध्ये देशात ५.२७ टक्क्यांनी निर्यात वाढली आहे आणि ही २७.४ अरब डॉलरवर पोहोचली आहे. याचवेळी देशात आयातीमध्ये  १९.६ टक्क्यांनी घट झाली असून सध्या ती ३०.३१ अरब डॉलरवर पोहोचली आहे. यामुळे सप्टेंबर २०२० मध्ये देशाचा व्यापार घाटा  कमी होत २.९१ अरब डॉलरवर पोहोचला आहे. 

सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात निम्म्याहूनही झाली कमी
केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०९ मध्ये देशाचा व्यापार घाटा ११.६७ अरब डॉलर इतका होता. सप्टेंबर २०२० मध्ये सोन्याच्या आयातीत जबरदस्त अशी ५२.८५ टक्के घसरण झाली. खरंतर, कोरोनाच्या संकटात सोन्याची मागणी कमी झाल्यामुळे आयातीत घट झालेली पाहायला मिळाली. यावेळी निर्यातीवरही मोठ्या परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. पण आता आर्थिक परिस्थिती सुधारत असल्यामुळे मागणीही हळूहळू वाढत आहे. यामुळे भारत सध्या जागतिक व्यापारामध्ये आपली भागीदारी वाढवण्यासाठी अधिक काम करत आहेत. सप्टेंबर २०२० मध्ये सप्टेंबर २०१९ च्या तुलनेत अन्नधान्याच्या निर्यातीत ३०४.७१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत आयातामध्ये झाली घट
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत म्हणजे एप्रिल-सप्टेंबरच्या दरम्यान, निर्यामतीमध्ये २१.४३ टक्क्यांनी घसरण झाली. ती सध्या १२५.०६ अरब डॉलर इतकी आहे. हेच पहिल्या सहामाहीत आयात ४०.०६ टक्के घसरत १४८.६९ अरब डॉलर होती. भारताने सप्टेंबर २०२० मध्ये निर्यात वाढवत कच्च्या तेलाची १०९.५२ टक्के, तांदूळ ९२.४४ टक्के, तेलाच्या कंपन्या ४३.९० टक्के आणि कार्पेटच्या निर्यातमध्ये ४२.८९ टक्के वाढ झाल्याचं नोंदवलं गेलं आहे. तक चांदीच्या आयातीमध्ये ९३.९२ टक्क्यांनी घसरण आली होती. याव्यतिरिक्त कच्चा कापूस आणि वेस्टे ८२.०२ टक्के, न्यूज प्रिंट ६२.४४ टक्के, सोनं ५२.८५ टक्के आणि ट्रान्सपोर्ट उपकरणं ४७.०८ टक्क्यांनी कमी आयात केली गेली आहेत.

Post a comment

0 Comments