मंदिराची घंटा पुन्हा वाजवा......मंदिरे उघडा उद्धवा....मंदिरे....उघडा...पैठण तालुका भाजपा चे एकदिवसीय लाक्षणिक उपोषणपैठण (प्रतिनिधी विजय खडसन)--- 

पैठण तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंदिरे उघडण्यासाठी शांतिब्राम्ह श्री एकनाथ महाराज मंदिराच्या प्रवेश द्वाराजवळ एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. मंदिर बंद, उघडले बार.....उद्धवा धुंद तुझे सरकार या प्रकारच्या उद्धव ठाकरे सरकारच्या विरोधात पैठण तालुक्यातील भारतीय जनता पार्टीने घोषणाबाजी करत मंदिर न उघडण्याच्या निर्णया विरोधात सरकारचा जाहीर निषेध नोंदवला. संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ठाकरे सरकारने बार सुरू आणि मंदिरे बंद करून महाराष्ट्रात काळे चित्र उभे केले आहे. या काळ्या निर्णया विरोधात आणि मंदिरे तातडीने उघडावीत या मागणी करिता पैठण तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. भाजपा महिला आघाडीच्या वतीने रेखाताई कुलकर्णी यांनी सरकारच्या विरोधात भारुड सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. ज्ञानेश्वर माऊली सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम नाम घोषाने ८ महिन्यानंतर संत एकनाथ मंदिर परिसर दुमदुमून निघाला.

भाजपा जिल्हा अध्यक्ष,विजय औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली व पैठण तालुका अध्यक्ष डॉ. सुनील शिंदे यांच्या नेतृत्वात, जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण औटे, किसान मोर्चाचे संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष कल्याण (नाना) गायकवाड, भाजपा पैठण शहराध्यक्ष, शेखर पाटील, कांता बापू औटे, बद्रीनारायन भुमरे, रेखाताई कुलकर्णी, अश्विनी लाखमले,  नम्रता पटेल, सुनील रासने, बंडू आंधळे,आप्पाभाऊ सोलाट, प्रशांत आव्हाड, विजय आचार्य, अनंत औटे रामनाथ केदारे,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a comment

0 Comments