विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून, स्वतः फडणवीस यांनी ट्वीट करुन या बाबत माहिती दिली.

याबाबत फडणवीस यांनी ट्वीट मध्ये म्हटले आहे की, ‘लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे.’यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक ट्वीट केले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी !’
राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विविध भागातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला. फडणवीस यांनी ९ जिल्ह्यांत प्रवास करुन शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना जाणून घेतल्या होत्या.त्याचबरोबर बिहार विधानसभा निवडणुकीची जबाबदारीही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आल्याने त्यांचा बिहार येथेही अनेकांशी संपर्क आला होता.

Post a comment

0 Comments