मराठीत बोलण्यास ज्वेलरचा आडमुठेपणा, लेखिकेच्या आंदोलनानंतर संदीप देशपांडेंचा दुकानदाराला चोप


मुंबई : मराठमोळ्या लेखिका शोभा देशपांडे यांच्याशी मराठी भाषेत बोलण्यास नकार देणाऱ्या मुंबईतील ज्वेलर्सला मनसेने चोप दिला. 
शोभा देशपांडे यांनी बारा तासांहून अधिक काळ कुलाब्यातील महावीर ज्वेलर्सच्या दुकानासमोर आंदोलन केले. दुकानदाराच्या आडमुठेपणाविरुद्ध शोभा देशपांडेंनी रात्रभर ठिय्या मांडल्यानंतर सकाळी आंदोलनस्थळी आलेले मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दुकानदाराला चोप दिला. 
कुलाब्यासारख्या दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू भागात हा प्रकार उघडकीस आला आहे. ‘महावीर ज्वेलर्स’ या दुकानदाराने मराठीत बोलण्यास नकार देऊन अरेरावी केली, दुकानाचा परवाना दाखवण्यास मनाई केली पोलिसांना बोलवून अपमानित केले, असा आरोप करत शोभा देशपांडे यांनी दुकानाबाहेर ठिय्या मांडला.

Post a comment

0 Comments