उपमुख्यमंत्री अजित पवार व दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यात बैठक, बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा...


निलेश जांबले
दौंड-पुणे
तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांसंबंधी राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्त व नियोजनमंत्री तथा पालकमंत्री, पुणे जिल्हा मा. ना. अजितदादा पवार साहेब यांचे समवेत बैठक पार पडली त्यामध्ये दौंड शहर व तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात *आमदार राहुलदादा कुल यांनी* चर्चा केली त्यामध्ये प्रामुख्याने -

१. खडकवासला धरणाचे नवीन मुठा उजवा कालवा, जुना मुठा उजवा कालवा (बेबी कॅनॉल ) , भिगवण शाखा कालवा(BBC) यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून, त्यामधून मोठ्या प्रमाणवर पाणी गळती होत आहे. त्याची दुरुस्ती, अस्तरीकरण व पोटचाऱ्यांची कामे आदी प्रस्तावांना कृष्णा खोरे विकास महामंडळ (नियामक मंडळाच्या) बैठकीत मान्यता मिळाली असून विशेष दुरुस्ती अनुदान अंतर्गत हि कामे तातडीने सुरु करावीत. 

२. खडकवासला पाटबंधारे मंडळ पुणे विभागातील अनेक पदे मागील काही अनेक दिवसापासून रिक्त असून, त्यामुळे पाण्याचे नियोजन करीत असतना कर्मचारी व अधिकारी यांचेवर अतिरिक्त तान येत आहे. तसेच पाणी चोरीचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणवर वाढलेले आहे. कर्मचारी कपातीमुळे अनेक अडचणीना तोंड द्यावे लागत आहे तेव्हा खडकवासला पाटबंधारे मंडळ, पुणे विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत.

३. दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे ५० खाटावरून  १०० खाटामध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी  आपण शासनाची मान्यता मिळविलीअसून, त्यासाठी शासनाने सुमारे ३३.५० कोटी रुपये निधीला मान्यता देखील दिली आहे. पहिल्या टप्प्याचा निधी उपलब्ध होऊन देखील नवीन  इमारतीच्या बांधकाम अद्याप सुरु झालेले नाही. सद्यस्थितीत कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता रुग्नालायचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे.   

४. दौंड तालुका क्रीडा संकुलाच्या संरक्षण भिंतीच्या कामासाठी  जिल्हा नियोजन समिती (DPDC) द्वारे निधीची तरतूद व्हावी. 

५. शेतकऱ्यांना वाटप करण्यात परंतु अद्याप निर्वणीकरण न झालेल्या वन जमिनींवरील राखीव वने शेरा हटविणेसाठी शेतकऱ्यांना मोठ्या कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागत असून निर्वनीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता यावी पुढील कार्यवाही करण्यासंदर्भात व स्वतंत्र यंत्रणा किंवा एजन्सी नेमण्यात यावी.

६. दौंड तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरु करण्यासाठी दि. १८ सप्टेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र अधिसूचनेनुसार मान्यता मिळाली असून , दौंड तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरु करण्याबाबत मागविण्यात येणाऱ्या हरकती व सूचनासाठी वाढीव कालावधी देऊन उपविभागीय कार्यालय तातडीने सुरु करण्याबाबत आपणाकडून संबंधितांना आदेश व्हावेत. 

७. मौजे वरवंड (ता. दौंड, जि. पुणे) येथील ग्रामीण रुग्णालय "विशेष बाब" म्हणून मंजुर करणेबाबत तत्कालीन आरोग्य राज्यमंत्री यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता व्हावी. 

८. २२ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या  शासन निर्णयानुसार नवबौद्ध अनुसूचित जाती जमाती मुलांची निवासी शाळा सन २०१६ –२०१७ च्या शैक्षणिक वर्षात सुरु करण्याचे आश्वासन तत्कालीन समाजकल्याण मंत्री यांनी दिले होते. परंतु जागेअभावी अद्यापही  शाळा सुरु झालेली नाही याबाबत  तातडीने कार्यवाही व्हावी. 

९.  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) मध्ये दौंड तालुक्यतील सुमारे ५१ गावांचा समावेश झाला असुन, त्यामधील महत्वाचे रस्ते व पुलांच्या विकासासाठी निधीची तरतूद व्हावी. 

१०. दौंड  येथे नवीन जिल्हा न्यायालय सुरु करण्याचा प्रस्ताव मा. उच्च नायालयाच्या शिफारशीने मंत्रालयात इनवर्डनंबर – २०११ / दि. १४.०३.२०१९ या क्रमांकाने सादर झालेला असून त्यावर त्वरित कार्यवाही व्हावी. 

*मा. आमदार राहुलदादा कुल* यांनी केलेल्या मागण्यांची दखल घेऊन संबंधित विभागांद्वारे उचित कार्यवाहीचे आदेश देण्याचे आश्वासन मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले.

Post a comment

0 Comments