मुंबईत वीज पुरवठ्याची जबाबदारी तुमची, चुका मान्य करा", ऊर्जामंत्री नितीन राऊत अधिकाऱ्यांवर भडकले

मुंबई : “मुंबईत संसद असती आणि पंतप्रधान बोलत असताना वीज ठप्प झाली असती तर तुम्ही काय उत्तर दिले असते?”, असा सवाल करत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी टाटा पॉवर या वीज निर्मिती कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

मुंबईत १२ ऑक्टोबर रोजी वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. याच पार्श्वभूमीवर नितीन राऊत यांनी आज (२६ ऑक्टोबर) राज्याला अखंडीत वीज पुरवठा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ऐरोली येथील राज्य भार प्रेषक केंद्राला भेट दिली. या केंद्राचे कामकाज कसे चालते, याची पाहणी त्यांनी केली.

Post a comment

0 Comments