महाड तालुका शिवसेना आढावा बैठक आज संपन्न.महाड, दि. ३१ रविवार : या बैठकीला उपस्थित संपर्क प्रमुख सदाभाऊ थरवळ,युवा सेना जिल्हा अधिकारी विकासशेठ गोगावले, जिल्हा प्रमुख अनिल नवगणे,विधानसभा संपर्क प्रमुख सुभाष पवार,उप जिल्हा प्रमुख पद्माकर मोरे,माजी जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर,महाड संपर्क प्रमुख विजय सावंत,पोलादपूर संपर्क प्रमुख किशोर जाधव,महाड तालुका प्रमुख सुरेश महाडीक,इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत आढावा बैठक मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली.

सदर बैठकांना प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांचा उत्साह आणि प्रतिसाद मिळत होता.
*पक्ष संघटना वाढी साठी मतदार नोंदणी, तसेच,शिवसेना सभासद नोंदणी साठी सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी या सर्वानी जोमाणे कामाला लागले पाहिजे तसेच आता लवकरच मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागणार आहेत, बहुसंख्येने महाड विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे, तरी सुद्धा विरोधकांकडे असलेल्या उर्वरित ग्रामपंचयतीवर सुद्धा कसा भगवा फडकेल या साठी सर्व शिवसैनिकांनी कामाला लागने गरजेचे आहे.

आपण आपल्या ताकतीवर निवडणूक लढवण्याची तयारी ठेवा कोणावर ही विसंबून राहू नका,
असे प्रमुख मान्यवरांनी उपस्थित शिवसैनिकांना सूचित केले.
या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती, उप सभापती, नगरसेवक,महाड शहर प्रमुख, युवा शहर प्रमुख, उप तालुका प्रमुख,विभाग प्रमुख,शाखा प्रमुख महिला संघटिका आणि आजी माजी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a comment

0 Comments