करते धरते आणि राज्यकर्ते यासह प्रशासनही एकाच माळेचे मणी... कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील अपघातामुळे स्थानिकांमध्ये नाराजी...


निलेश जांबले
दौंड-पुणे...
वारंवार अपघातामुळे चर्चेत येणारी पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहत नेहमी चर्चेत येत आहे. या औद्योगिक वसाहतीमध्ये कोणताही अपघात घडला की गाव पुढारी नेतेमंडळी भेट देतात, व आपली मांडवली करतात असा सवाल स्थानिक करत आहेत...
औद्योगिक सुरक्षा विभाग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे अधिकारीही अपघात घडल्यानंतर उपस्थित राहतात व गुन्हा दाखल करण्यापलीकडे काहीच करत नाहीत, नियम धाब्यावर बसून उत्पादन घेणा-या कंपन्यांना हेच अधिकारी वरदहस्त देऊन आर्थिक तडजोडी करत कायमच पाठीशी घालतात.यामुळे येथे वारंवार अपघात घडतात. अशा घडणाऱ्या अपघातामुळे स्थानिकांची मोठी तारांबळ उडत असून, जीव मुठीत घेऊन इतरत्र पळ काढावा लागत आहे. यांस सर्वस्वी करते धरते आणि राज्यकर्ते सह प्रशासनही जबाबदार असून नियमबाह्य उत्पादन करणार्‍या उद्योगांवर कारवाई का होत नाही असा अनेकांना पडत आहे...
आर्थिक मलिदा खाऊन नियमबाह्य काम करणाऱ्या उद्योगांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना येणाऱ्या काळात काळं फासु व निषेध करू असा पवित्रा सामाजिक संघटनांनी घेतला आहे...

Post a comment

0 Comments