पैठण (प्रतिनिधी विजय खडसन ):--
आज दिनांक १५.१०.२०२० गुरुवार रोजी समाजाचे जेष्ठ नेते माजी खासदार तथा राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष. श्री हरीभाऊजी राठोड यांच्या अवाहनानुसार पैठण तालुका आॅल इंडिया बंजारा सेवा संघा च्या वतीने आज डफढा बजाओ आन्दोलन करण्यात आले.
संघाचे प्रदेशाध्यक्ष राजपाल सिंह राठोड, प्रवक्ते डॉ. कृष्णा राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण तालुकाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके साहेब यांच्या मार्फत मुख्यमंत्री मा.श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी देण्यात आलेल्या निवेदनात १)बंजारा समाजा आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न २) क्रिमीलेयर ची अट रद्द करणे ३) बढतीमधील आरक्षण ४) वसंतराव नाईक तांडा-सुधार योजना ५) राज्यातील संपूर्ण तांडयास महसुली दर्जा ६) भारतातील ११ कोटी लोकसंख्या असलेल्या गोरबोली भाषेला, राष्ट्रीय भाषा सुचीत दर्जा देणे इ. चा समावेश होता.
0 Comments