मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलनाचा पोलीसांनी घेतला धसका पैठण - औरंगाबाद रोडवरील टायर उचलुन ठेवण्याचे आदेश पैठण प्रतिनीधी विजय खडसन:--

मराठा आरक्षणाबाबत सुनावनी पुढे ढकलल्यानंतर पुन्हा एकदा या आंदोलनाने पेट घेतला आहे.मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतिने मंगळवारी राज्य व केंद्र सरकारच्या भुमिकेबाबत औरंगाबाद - पैठण रोडवरील बिडकीन येथिल निलजगाव फाट्यावर टायर जाळुन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.या आंदोलनातील मराठा समन्वयकांसह आठ  कार्यकर्त्यांना बिडकीन पोलीसांनी अटक करून गुन्हे दाखल केले आहेत.
या आंदोलनाची दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशाने खबरदारीचा उपाय म्हणुन पैठण - औरंगाबाद व ईतर मुख्य रस्त्यावरील बाहेर पडलेले पंम्चर दुकानातील टायर दुकानाच्या आत ठेवण्याचे आदेश आज पोलीसांनी दुकानदारांना दिले.असे न केल्यास अपणा विरूद्ध कायदेशीर कारवाई करू असा इशाराही पोलीसांनी दिला.
बिडकीन येथे झालेल्या आंदोलनात एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत आरक्षणाविषयी गंभिर नसलेले मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची मुख्यमंञ्यांनी तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणीही आंदोलकांनी केली होती.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे.या स्थगितीच्या विरोधातील याचिकेवर मंगळवारी सुनावनी होती.ति सुनावणी पुढे ढकलण्यात आली.या सुनावनीला सरकारी वकीलच गैरहजर होते.त्यामुळे याविषयी महाविकास आघाडी सरकार गंभिर नाही असा आरोप करीत सायंकाळी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे पदाधिकारी रस्त्यावर उतरत टायर जाळुन रास्ता रोको केला होता.
या प्रकरणी राञी उशिरा आंदोलनातील कार्यकर्त्यांवर बिडकीन पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक किरण काळे पाटील यांनी आंदोलकांना अटक केल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतिने सरकार विरोधात राज्यभरात आंदोलनाची धार तिव्र करणार असल्याचा गंभिर इशारा दिला आहे.या प्रकाराबाबत राज्य सरकार व पोलीसांनी चांगलाच धसका घेतला असुन खबरदारीचा उपाय म्हणुन पोलीस आंदोलकांवर नजर ठेऊन आहेत.

प्रतिक्रिया -  
सरकार पोलीसांना पुढे करून मराठा समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे.मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची समितीवरून तात्काळ हकालपट्टी करावी.
सरकारने कितीही षडयंञ केले तरी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात मराठा क्रांती ठोक मोर्चा राज्यभर गणिमी काव्याने तिव्र आंदोलन करणार आहे.
        
                        किरण काळे पाटील
           समन्वयक,मराठा क्रांती ठोक मोर्चा

Post a comment

0 Comments