"विरोधी पक्षाने त्यांच्या काळात सरसकट कधी मदत दिली हे त्यांनी शपथ घेऊन सांगावं"- पालकमंत्री हसन मिश्रीफ यांनी दिलं आहे.

अहमदनगर : “विरोधी पक्षाने त्यांच्या काळात सरसकट कधी मदत दिली हे त्यांनी शपथ घेऊन सांगावं”, असं आव्हान अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं आहे. मुश्रीफ यांनी आज (२२ ऑक्टोबर) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील भागाची पाहणी केली. विरोधी पक्षावर सडकून टीका केली. 

आम्ही अनेक वर्ष राज्य कारभार केला आहे. जनतेला मदत कशी मिळवून द्यायची ते आम्हाला चांगलं माहित आहे. आमची जनतेशी नाळ जोडली गेली आहे. त्यामुळे आता आम्ही काय करावं, हे त्यांनी आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही”, असा टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला.

Post a comment

0 Comments