मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवा, शिवसेनेची गृहमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : हाथरस प्रकरणी मुंबईत गुन्हा नोंदवून, मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवावे अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. प्रताप सरनाईक यांनी ट्वीट करुन उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर हल्लाबोल केला. 
प्रताप सरनाईक म्हणाले, “देशाला संतप्त करणाऱ्या, मानवतेला काळीमा फासणाऱ्या हाथरस घटनेची पारदर्शक चौकशी न करता योगी सरकारने अत्यंत बेजबादारपणे, अमानवी पद्धतीने ती हाताळल्याचे दिसतेय. मुंबईत यावर गुन्हा नोंदवून मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवावे अशी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मी विनंती केेली.

Post a comment

0 Comments