जनावरांचे लसीकरण संपन्न शेतकर्या चा प्रचंड प्रतिसाद जन मंगल संघानी केली होती मागणीसिल्लोड:गेवराई शेमी ता. सिल्लोड येथे जनावरांचे लसीकरण शिबीर मंगळवार (दि.0६) रोजी उत्साहात पार पडले.गावातील पशुपालकांनी सकाळपासूनच गावातील विविध चौकात बैल, गाय, म्हैस आदी जनावरांना आणण्यास सुरवात केली होती. कोरोना संसर्गाचा विचार करून पशुधन विकास अधिकारी बि.बि.गायकवाड यांनी गावातील चार चौकात लसीकरण शिबिराची व्यवस्था केली होती. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी जनावरांची पाय व तोंडाची  तपासणी व लसीकरण केले.
गावकऱ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता.पशुधन विकास अधिकारी सिल्लोड यांना पत्र देऊन जन मंगल संघाच्या वतीने सतत याविषयी पाठपुरावा केला होता.गावातील पशुपालकांनी जन मंगल संघाचे व पशुधन कार्यालयाचे आभार मानले आहे.यावेळी उत्तम ताठे, पंढरीनाथ ताठे, महादु पल्हाळ, कारभारी ताठे गुरजी, रामेश्वर ताठे, भगवान ताठे आदींचे सहकार्य लाभले


पशुधन विकास अधिकारी यांनी तातडीने निवेदनाची दखल घेतल्या मुळे लसीकरण शक्य होऊ शकलं यामुळे अनेक जनावरांना जीवदान मिळेल व शेतकर्या चा सुध्दा येणार्या काळातील खर्च वाचेल, पशुधन विकास अधिकारी यांचे आभार 

प्रा राहुलकुमार ताठे
अध्यक्ष जन मंगल संघ

Post a comment

0 Comments