-सोयगाव परिसरात ढगाळ वातावरणासह किरकोळ पावसाने मजुरांची धावपळ उडविली.

सोयगाव / प्रतिनिधी
 कापूस वेचणीचा रविवारचा दिवस ढगाळ वातावरण असल्याने मजुरांनी ढगाळ वातावरणातच कापूस वेचणीचे कामे हाती घेतले असतांना अचानक दुपारनंतर आलेल्या अवकाळी पावसाच्या किरकोळ सरींनी मजुरांच्या सोबतच शेतकऱ्यांचीही धावपळ उडाली होती.

     सोयगाव परिसरात रविवारी कापूस वेचणीची धावपळ सुरु असतांना दिवसभर ढगाळ वातावरण आणि दुपारी आलेल्या किरकोळ पावसाच्या सरींनी कापूस भिजण्याच्या भीतीने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती.मात्र संध्याकाळी उशिरापर्यंत ढगाळ वातावरण असल्याने वेचणी केलेला बंधाऱ्यावरील कापूस घरी आणण्यासाठी शेतकऱ्यांनी गतिमान वेग घेतला.

    -दिवसभर सूर्यदर्शन नाही...दुपारी सरी कोसळल्या-----

  सोयगाव परिसरात रविवारी दिवसभर सूर्यदर्शन झाले नसतांना ढगाळ वातावरणात मजुरांनी कापूस वेचणी सुरूच ठेवली त्यातच अचानक किरकोळ पावसाच्या सरी कोसळल्याने काहीवेळ कापूस वेचणीच्या कामात व्यत्यय आला होता.मात्र पावसाच्या सरींचा जोर अधिक नसल्याने पुन्हा वेचणीची लगभग मजुरांनी घेतली.

Post a comment

0 Comments