भारतीय बाजारपेठेत आगमन टेस्ला’चे- कंपनीचे सीईओ एलन मस्क

मुंबई : जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार निर्माती कंपनी ‘टेस्ला’चे  भारतीय बाजारपेठेत आगमन होण्याचा संकेत कंपनीचे सीईओ एलन मस्क यांनी दिले आहेत. पुढच्या वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये टेस्ला भारतीय बाजारपेठेत  उतरू शकते. आपल्या ट्विटर पोस्टमधून एलन मस्क यांनी हे संकेत दिले आहेत. एका भारतीय युजरने ट्विटरवर एलनला भारतात येण्यासंदर्भात प्रश्न विचारला होता.

एलन मस्कने या ट्विटला उत्तर देताना, दोन टी-शर्टचे फोटो पोस्ट केले आहेत. यातील एका टी-शर्टवर ‘इंडिया लव टेस्ला’, तर दुसऱ्या टी-शर्टवर ‘इंडिया वॉन्ट टेस्ला’ असे लिहिले आहे. या फोटोंसोबत ट्विट करत, ‘पुढच्या वर्षी नक्की. वाट पाहण्यासाठी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार!’, असे म्हटले आहे. या आधीही बऱ्याचदा टेस्लाने  भारतीय बाजारपेठेत उतरण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, काही सरकारी नियमांमुळे त्यांच्या प्रवेशावर निर्बंध आले होते.

Post a comment

0 Comments