रोजगार सेवकांचे प्रश्न सोडवणार - मंत्री संदीपान भुमरे


पैठण प्रतिनिधी विजय खडसन :---

 पैठण  ग्रामीण भागातील अनेक योजना ह्या रोजगार हमी योजने मार्फत राबविल्या जातात. या योजना राबविण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर ग्राम रोजगार सेवकांची निवड केलेली आहे. 
गोरगरीब व मजूर लोकांना गावातच हाताला काम मिळावे व रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी रोजगार हमी योजनेतून अनेक कामे केली जात आहेत. 
या कामावरील मजुरांचे मस्टर काढणे व सर्व नोंदी शासकीय स्तरावरती करून ठेवण्याचे काम रोजगार सेवकांना टक्केवारी कमिशन वर करावे लागते. 
ही टक्केवारी कमिशन अर्थात मिळणारे मानधन खूप तुटपुंजे असून सहा महिने ते एक वर्ष हे मानधन मिळत नाही. 
रोजगार सेवकांच्या समस्या बाबत ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटनेचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष श्री शिवाजी गाडे यांच्या नेतृत्वाखाली रोहयोमंत्री श्री संदिपान भुमरे साहेब यांची नुकतीच भेट घेण्यात आली. 
रोहयो मंत्री श्री संदिपान भुमरे यांना संघटनेतर्फे विविध समस्याबाबत निवेदनही देण्यात आले. महाराष्ट्रातील ग्रामरोजगार सेवकांच्या प्रश्नाबाबत मी बैठक घेतली असून लवकरच या समस्या सोडविण्याबाबत शासकीय पातळीवरून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन रोहयो मंत्री श्री संदिपान भुमरे यांनी शिष्टमंडळाला दिले. 
या शिष्टमंडळात कैलास डांगे ,शेख अमीन, भाऊसाहेब काकडे, मदन बोंद्रे, दत्तात्रय सोनवणे, ज्ञानदेव गीते, विलास थोरात ,कृष्णा राजगुरू, भिवराज यादव, दीपक लांडगे, संजय रोडगे सह तालुक्यातील अनेक ग्राम रोजगार सेवक उपस्थित होते

Post a comment

0 Comments