दौण्ड तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या युवक आघाडी अध्यक्षपदी राहुल दोरगे यांची नियुक्ती...


निलेश जांबले
दौंड पुणे... 

सामाजिक कार्याची आवड व अन्याया विरोधात आवाज उठवण्याची ताकद, तसेच आपल्या सामाजिक कार्याची दखल घेत प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.नामदार ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू(मा.राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशावरून तसेच पक्षाचे कार्यध्यक्ष मा श्री. बल्लुभाऊ जवंजाळ व पक्ष प्रवक्ते मा श्री अजय महाराज बारस्कर , पुणे जिल्हा संघटक मा.नीरज कडू . पुणे जिल्हा प्रहार युवक आघाडी अध्यक्ष मा. श्री अजिंक्य बारणे यांच्या सुचनेवरून श्री रमेश शितोळे-देशमुख 
प्रहार जनशक्ती पक्ष दौण्ड तालुका अध्यक्ष यांच्या हस्ते राहुल दोरगे रा. (यवत स्टेशन)ता.दौण्ड जि. पुणे.यांची
 प्रहार जनशक्ती पक्षाच्या दौण्ड तालुका युवक आघाडीच्या अध्यक्षपदी पत्र देवून नियुक्ती करण्यात आली आहे. 
    प्रहार जनशक्ती पक्ष बळकटीसाठी व तळागाळापर्यत मजबुत करण्यासाठी तसेच मा. नामदार बच्चुभाऊ कडू यांचे व पक्षाचे ध्येय धोरणे सर्व सामान्यपर्यत पोहचवण्यासाठी तसेच राज्यातील शेतकरी , कामगार , गोरगरीब, शोषीत ,अपंग , पीडीत यांना न्याय मिळवून देण्याचे काम करण्याचा मानस मनाशी बाळगून हि जबाबदारी स्वीकारत असल्याचे दोरगे यांनी सांगितले. पक्षाच्या विचारांसह आपण सर्व सामान्य जनतेच्या सेवेत अखंड कार्यरत राहणार असल्याचे दोरगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले... त्याच्या निवडीबद्दल परिसरामध्ये कौतुक केले जात आहे...

Post a comment

0 Comments