पैठण तालुक्यातील ग्रामपंचायत मधिल चौदाव्या वित्त आयोग निधीत खर्च झालेल्या विकास कामाचे फलक दर्शनी भागात लावा छावा क्रांतिवीर सेनेची मागणी


पैठण प्रतिनिधी विजय खडसन:---

पैठण तालुक्यातील गाव निहाय ग्रामपंचायत मार्फत करण्यात आलेले विकास कामाचे फलक जनतेच्या नजरेस पडेल अशा ठिकाणी लावण्यात यावे यासाठी छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने गटविकास अधिकारी विजय लोंढे यांना या बाबत निवेदन देण्यात आले.
पैठण तालुक्यातील महसूल गावाची संख्या १९१ असून एकूण ग्रामपंचायत संख्या १०७ इतकी आहे. राज्य सरकार/केंद्र सरकार यांनी ग्रामपंचायत मधील नागरिकांना सुविधा मिळावी यासाठी विविध योजनेअंतर्गत भरघोस निधी देत असून, त्यामध्ये सुद्धा वेळोवेळी चांगले निर्णय घेत कुठलाही आडमार्गाने न ठेवता प्रशासकीय निधी सरळ ग्रामपंचायत खात्यावरती वर्ग करण्यात येत आहे. त्यामध्ये 14 वित्त आयोग, जनसुविधा, पाणीपुरवठा, विशेष प्रकल्प निधी, घरकुल, स्वच्छ भारत मिशन, दलित वस्ती सुधार योजना, 25/15 अशा अनेक योजनेअंतर्गत गाव विकासासाठी निधी राज्य सरकार/केंद्र सरकार यांच्याकडून प्राप्त होत आहे. या निधीचा विनियोग करण्याचे कार्य प्रशासकीय अधिकारी ग्रामसेवक तथा सरपंच यांचे असते परंतु कित्येक ठिकाणी ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार करण्यात आला व त्या संदर्भात अनेक तक्रारी येत आहे. विकास कामे व त्यावर खर्च निधी इतर ग्रामस्थांना समजले पाहिजे यासाठी वरील संदर्भीय विषयानुसार आपण या निवेदनावर दखल घेत पैठण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत/ग्रामसेवक यांना करण्यात आलेली विकास कामाचे फलक लावने अनिवार्य व बंधनकारक आहे. हे आपल्या कार्यालयीन स्तरावरून सूचित करावे असे निवेदनात छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत यांनी नमूद केले आहे.
यावेळी उपस्थित प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत, मराठवाडा अध्यक्ष रामेश्वर बावणे, जिल्हा सचिव भगवान सोरमारे, भाऊराव धरम, अनिल मगरे, अर्जुन कदम, नितेश वैद्य आदी छावा क्रांतिवीर सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a comment

0 Comments