नांदेडमधील हल्लाबोल मिरवणुकीत तुफान गर्दी; गुरुद्वारा कमिटीवर गुन्हा

नांदेड : दसऱ्याच्या निमित्तानं काढलेल्या पारंपरिक हल्लाबोल मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांवर वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 
आणि इतर पदाधिकाऱ्यांवर वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 
वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप शिवले याप्रकरणी अधिक तपास करतायत. हल्लाबोल मिरवणुकीसाठी उच्च न्यायालयाने मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करावा, असे आदेश दिले होते, मात्र यावेळी मोठी गर्दी जमल्याचे उघड झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबई उच्च न्यायालयानं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घातलेल्या नियमांची नांदेड गुरुद्वारा कमिटीकडून पायमल्ली करण्यात आली आहे.

Post a comment

0 Comments