अजित पवारांनी दौरे टाळले, कणकण आणि ताप आल्याने घरीच विश्रांती, कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली वैद्यकीय चाचणी केली. अजित पवारांना कणकण आणि थोडासा ताप असल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली. सुदैवाने त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अजित पवारांच्या कोरोना चाचणीबाबत उलट-सुलट चर्चा सुरु होती. मात्र त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. अजित पवार यांनी मेडिकल चेकअप केल्यानंतर आज ते घरीच थांबून विश्रांती घेत आहेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांनी सोमवारी सोलापूर दौऱ्यावर जावून, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरातही उपस्थित होते. आजही उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात उस्मानाबादमध्ये पाहणी करत आहेत.

Post a comment

0 Comments