नुकसानग्रस्त भागाची पाहणी - पंकजा मुंडे

बीड:- भाजप नेत्या पंकजा मुंडे तब्बल आठ महिन्यांनंतर बीड जिल्ह्यात परतल्या आहेत.या  याच गोष्टीच्या आनंदात कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात, बँड वाजवत, फटाके फोडून मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं.
भाजप कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांचं जालना-बीड सीमेवर जंगी स्वागत केली. यावेळी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी उसळली होती.पंकजा मुंडे यांच्या स्वागतासाठी शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडाला. पंकजा मुंडे बीडमध्ये दाखल होताच त्यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची कार्यकर्त्यांसह पाहणी केली.
यावेळी शेतकऱ्यांनी पंकजा यांना नुकसान झालेल्या कपाशीचे पीकं दाखवली.काही शेतकऱ्यांचं संत्री, मोसंबी आणि इतर पीकांचंदेखील प्रचंड नुकसान झालं आहे.

Post a comment

0 Comments