आपेगाव गटाच्या जि.प.सदस्या शिल्पा कापसे यांच्या पतीने. केली वडवाळीच्या सरपंचाला जातीवाचक, शिवीगाळ,व जिवे मारण्याची धमकी अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी


पैठण ( प्रतिनिधी विजय खडसन:)--- पैठण तालुक्यातील आपेगाव गटाच्या जि. प.सदस्या शिल्पा कापसे यांचे पती ज्ञानेश्वर कापसे यांनी दि.४/१०/२०२० रोजी शहागड फाट्याजवळ वडवाळी गावचे सरपंच गणेश गायकवाड यांना अडवून त्यांना जातीवाचक शिविगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सरपंच गणेश गायकवाड यांनी पैठण पोलीस ठाण्यात जिल्हा परिषद सदस्या शिल्पा कापसे यांचे पती ज्ञानेश्वर कापसे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

सरपंच गणेश गायकवाड यांच्या दुचाकीला कापसे यांनी त्यांची चारचाकी गाडी आडवी लावली व बस गाडीत तुला पाटेगावच्या पुलाच्या खाली नेऊन टाकतो अशी जीवे मारण्याची धमकी दिली. धेडग्या, झवण्या लय माजलास का? आम्ही तुला सरपंच बनवले तू आमच्या चौकश्या लावतो काय? दाखवतो तुला असे जातीवाचक शिवीगाळ करून त्यांना त्यांच्या चारचाकी गाडीत टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु गणेश गायकवाड यांनी प्रसंगावधान बघून तेथून पळाले.

सरपंच गणेश गायकवाड यांनी कापसे यांनी केलेल्या बोगस कामाची चौकशी लावल्याचा राग मनात धरून जिल्हा परिषद सदस्या शिल्पा कापसे यांचे पती ज्ञानेश्वर कापसे यांनी सरपंच यांना जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अगोदरच महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात दलितांवर वाढते अत्याचार होत असतांना या पर्शवभूमीवर पैठण पोलीस स्टेशन अश्या दबंग गुंड प्रवृत्तीच्या जिल्हा परिषद सदस्याचा पती विरुद्ध काय कार्यवाही करणार याची चर्चा पैठण तालुक्यात होत आहे. 

सदर प्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे व पैठण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी दिले आहे.

Post a comment

0 Comments