शेतकऱ्यांचे शेवटचे टिपरु शिल्लक असे पर्यंत कारखाना चालू ठेवणार - संदीपान भुमरे.


पैठण, दि.27 मंगळवार : पैठण तालुक्यातील विहामाडवा येथिल रेणुका शुगर मिल संचालित रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याच्या सण २०२०-२१ च्या गळीत हंगामाला मा.ना.संदीपान भुमरे याच्या हस्ते उसाची मोळी टाकून शुभारंभ करण्यात आला. पैठण तालुक्यात या वर्षी उसाचे फार मोठ्या प्रमाणात क्षेत्र असल्याने ऊस उत्पादक शेतकरी यांनी घाई गडबड करू नये, ह्या वर्षी उसाचे शेवटचे टीपरु शिल्लक असे पर्यंत कारखान्याचे गाळप बंद करणार नाही अशी हमी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यावेळी नामदार संदीपान भुमरे यांनी यावेळी बोलतांना हि माहिती दिली.


रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याचा या वर्षीचा गळीत हंगाम चालू करण्यासाठी २७ ऑक्टोबर २०२० रोजी सुरू केल्याचे जाहीर केले. सन. २००२०-२१ साठी ऊस वाहतूक यंत्रने विषयी माहिती देताना कारखान्याचे कार्यकारी संचालक बावडकर ( एम.डी.) यांनी सांगितले की या वर्षी ३५० टायर गाडी, १५० जुगाड, ५० ट्रॅक्टर व ऊसतोड टोळ्यांची यंत्रणा सज्ज केली असल्याचे सांगितले. या कारखान्याची प्रति दिन १२५० मेट्रिक टन गाळपाची क्षमता असल्याने या वर्षी कारखान्याने 3 लाख 25 हजार मेट्रिक टन गाळपाचे उद्दीष्ट समोर ठेवले आहे.

उसाचे शेवटचे टीपरु शिल्लक असे पर्यंत गाळप सुरू ठेवणार असल्याचे नामदार संदीपान भुमरे आणि या वेळी सांगितले.

कोणत्याही कारखान्यांचे दर जाहीर झाले नाही ऊसाच्या दरांची कोंडी लवकरच फुटेल इतर कारखाने ऊसाला जो दर देतील त्याचं दराप्रमाणे शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव देणार असल्याचे मंत्री तथा चेअरमन संदिपान  भुमरे यांनी सांगितले

Post a comment

0 Comments