मुंबई में बत्ती गुल बा, बिहार में लाइट फुल बा',नितीशकुमारांच्या रॅलीत घोषणा.

पाटणा: सुशांत सिंह प्रकरणानंतर आता मुंबईत खंडित झालेला वीजपुरवठाही बिहार विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा झाला आहे. बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे नेते यांच्या सोमवारी झालेल्या प्रचारसभेत ‘मुंबई में बत्ती गुल बा, बिहार में लाइट फुल बा’ अशा घोषणा देण्यात आल्या. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या संजय झा यांनी मुंबईतील पॉवर ब्रेकडाऊनवर सोशल मिडीयावर फिरत असलेल्या एक मजेशीर मेसेज वाचून दाखवला. यानंतर सभेच्या ठिकाणी ‘मुंबई में बत्ती गुल बा, बिहार में लाइट फुल बा’, अशा घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे बिहार निवडणुकीच्या आगामी प्रचारातही नितीश कुमार आणि भाजपकडून ‘मुंबई कार्ड’ वापरले जाण्याची शक्यता आहे.
Post a comment

0 Comments