दौंड शहरातील छायाचित्रकार केदार भागवत यांचा लिंगाळी हद्दीत खून


निलेश जांबले
दौंड पुणे.
दौंड - लिंगाळी रस्त्यालगत काळे मळा येथील कालव्यालगत आज सकाळी साडेनऊ वाजता केदार भागवत (वय ४६, रा. दौंड) यांचा मृतदेह आढळून आला. डोक्यात दगड घालून व बाटली फोडून खून करण्यात आला आहे. मृतदेहाजवळ दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत. प्रभारी पोलीस उप अधीक्षक नारायण शिरगावकर , पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. या बाबत अभिजित श्रीपाद भागवत ( रहाणार भागवत फोटो स्टुडिओ डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक दौंड वय ४१ ) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
  अद्याप   खुनाचे कारण स्पष्ट झालेले नाही. 
                  शहरातील ज्येष्ठ छायाचित्रकार श्रीपाद भागवत यांचे केदार हे ज्येष्ठ चिरंजीव आहेत. 
                 दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी या बाबत सांगितले की, डोक्यात दगड घालून खून केल्याचे आढळून आले आहे. सर्व शक्यता विचारात घेऊन खुनाचा तपास केला जात आहे.

Post a comment

0 Comments