मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर साखरेच्या पोत्याचा ट्रक पलटी, दोन अपघातात दोघांचा मृत्यू

पुणे : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर दोन विचित्र अपघात झाले आहेत. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहे. या अपघातांमुळे वाहतुकीवर परिणाम निर्माण झाला आहे. 

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाखाली मुबंईकडे येणाऱ्या रस्त्यावर साखरेच्या पोत्याचा ट्रकला अपघात झाला. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. या ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने हा ट्रक पलटी झाला. त्यानंतर चालक खाली पडला. त्याचवेळी ट्रकच्या मालाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

Post a comment

0 Comments