आघाडीचे नेते बांधावर जाऊन फोटो काढणार अन् शेतकऱ्यांना मदत केंद्राने करायची? निलेश राणेंचा खोचक सवाल

मुंबई : महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आज (१९ ऑक्टोबर) पाऊस नुकसान पाहणी दौरा करत आहेत. मात्र, या दौऱ्यावर माजी खासदार निलेश राणे यांनी टीका केली आहे. “महाविकास आघाडीचे नेते शेतीच्या बांधावर जाऊन फोटो काढणार आणि शेतकऱ्यांना केंद्र सरकार मदत करणार?”, असा खोचक सवाल निलेश राणे यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उस्मानाबाद दौऱ्यादरम्यान आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार, असं सांगितलं. मात्र, यावर निलेश राणे यांनी टीका केली.

Post a comment

0 Comments