पुरंदर तालुका जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष शिवमती दुर्गा उरसळ मराठा आरक्षणासाठी आक्रमण...


निलेश जांबले दौंड-पुरंदर, पुणे
मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा जन पुरंदर यांच्यावतीने पुरंदर येथे तहसीलदार रूपाली सरनोबत यांना आरक्षण स्थगिती आदेश संदर्भात निवेदन देण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा विषय घटनापीठाकडे सुपूर्त करताना जो स्थगिती आदेश दिला आहे. राज्यसरकारने घटना तज्ञांचा सल्ला घेऊन सदरची स्थगिती  उठवण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर बाब अवलंबित करावी. पहिला पर्याय आहे तो मुख्य न्यायमूर्तींकडे अर्ज करून घटना पिठाची स्थापना करून स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करावेत. न्यायालयाचा स्थगिती आदेश येण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन व नियुक्त्या निवड जाहीर झालेल्या आहेत या संरक्षित करण्यात याव्यात. विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे हे शासनाने होऊ देऊ नये. स्थगिती उठविण्याच्या बाबतचा निर्णय येेईपर्यंत एसईबीसी प्रवर्गातील घटकांना व विद्यार्थ्यांना आरक्षण सोडून ज्या सवलती आहेत ते सुरू ठेवाव्यात. अशी मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे. यावेळी जिजाऊ ब्रिगेड पुरंदर तालुका अध्यक्ष शिवमती दुर्गा उरसळ, उपाध्यक्ष शिवमती भाग्यश्री यादव उपस्थित होत्या.

माननीय तहसीलदारांना कोरोनाच्या संकटामुळे सोशल डिस्टंसिंग चे पालन करून मोजक्या समन्वयकांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

Post a comment

0 Comments