येत्या नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्र पूर्ण अनलॉक होणार? -राजेश टोपे

अहमदनगर : राज्यात आता लॉकडाऊनचा विषय राहिलेला नाही. येत्या नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्र पूर्ण अनलॉक होणार, असे स्पष्ट संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. “कोरोनावर अद्याप प्रतिबंधक लस आलेली नाही. त्यामुळे आपल्याला कोरोनासोबतच जगावं लागणार आहे, असेही राजेश टोपे म्हणाले. अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याबाबतची माहिती दिली. 
येत्या नोव्हेंबरपर्यंत राज्यात सर्व काही अनलॉक केलं जाणार आहे. पुढील काही दिवसात राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा उघडण्यात येतील आणि नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल,” अशी अपेक्षा करूया असे राजेश टोपे म्हणाले.

Post a comment

0 Comments