महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषदेच्या तालुका अध्यक्ष पदी अविनाश गर्डे यांची निवड


पैठण प्रतिनिधी विजय खडसन :--

महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषदेच्या पैठण तालुका अध्यक्ष  पदी अविनाश गर्डे यांची निवड  करण्यात आली. अध्यक्ष प्रभुलाल झलवार,कार्यवाह सुरेश पठाडे व मुख्याध्यापक भास्करराव कुलकर्णी 
यांच्या मार्गदर्शनानुसार अविनाश गर्डे यांची  संघटनेचे कार्य  ,संघटनेवरील निष्ठा , संघटन कौशल्य व  कार्याची दखल घेऊन आज त्यांची पैठण तालुका अध्यक्षपदी निवड  करण्यात आली आहे. पैठण तालुक्यातुन  त्यांच्यावर शूभेच्छाचा वर्षाव होत आहे. 
याप्रसंगी डॉ. राम लोंढे, डॉ. जयंत जोशी, डॉ. पद्मकुमार कासलीवाल, विजय चाटुपळे,अनिल घायवट,श्रीराम बोचरे,दिलीप कुंदे , कृष्णा मते,किरण गाडेकर,संतोष मळे, प्रकाश लोखंडे, दयानंद लकशेटे, प्रमोद कोकाटे, दत्तात्रय सपाटे , योगेश दातीर , सुभाष लोंढे,विलास खर्डेकर, प्रमोद काकडे, सुनिल कुंभार, विनोद सरोदे, आशुतोष पानगे,गणराज जाधव,विनोद घनवट, राम काकडे,गणेश जोशी आदींनी विशेष अभिनंदन केल

शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यास कटीबध्द :- सुरेश पठाडे 
 
 महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषद  ही राज्यातील सर्वात जुनी व सर्वात मोठी संघटना असल्याचे सांगून शिक्षक समस्या सोडवण्यासाठी  आग्रही असल्याचे स्पष्ट केले. जिल्हा पातळीवरील शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषद कटीबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला.


*महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा विश्वास सार्थ करणार:-अविनाश गर्डे , (तालुका अध्यक्ष*)  

शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तालुकाध्यक्ष या नात्याने विशेष प्रयत्न करणार आहे.

Post a comment

0 Comments