जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश


 वैजापूर(प्रतिनिधी/राहुल त्रिभुवन) : 

वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले आहे.जिल्हा परिषद प्रशाला खंडाळा येथे डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन दिन व विद्यार्थी दिन साजरा करून इयत्ता 5वी व 8वी च्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार करण्यात आला याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक  गवळी हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून खंडाळा केंद्राचे मुख्याध्यापक  आर एल पाटील  होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक अशोक दारवंटे यांनी केले तर आभार प्रदर्शन इद्रिस मोगल  यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांचे पालक युसूफ खान, दत्तात्रय वाघमारे ,चौधरी, श्रीमती कुमावत , श्रीमती गवारे  व इतर गावकरी सोशल डिस्टंसिंग सह व मास्क लावून उपस्थित होते तसेच वाचन दिनानिमित्त सहभागी झालेले विद्यार्थी होते

  प्रशालेतील इयत्ता पाचवीतुन आयान पठाण, अबुजर शेख, आयान  पठाण तर इयत्ता आठवीत विकी वाघमारे यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीस पात्र ठरले.यामुळे पात्र विद्यार्थ्यांचे  तसेच सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे खंडाळा व परिसरात कौतुक होत आहे.

Post a comment

0 Comments