कसबा मतदारसंघातील युवासेना पदाधिकारी दीपक मारटकर यांच्यावर कोयता आणि चाकूने जीवघेणा हल्ला

पुणे : पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील युवासेना पदाधिकारी दीपक मारटकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली. दीपक मारटकर यांच्यावर पाच ते सहा जणांनी मध्यरात्री हल्ला केला होता. दीपक मारटकर हे शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक विजय मारटकर यांचे चिरंजीव होते. 

कोयता आणि चाकूने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात दीपक मारटकर गंभीर जखमी झाले होते. गुरुवारी रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पुण्यातील बुधवार पेठेतील गवळी आळीसारख्या शहरातील मध्यवर्ती भागात घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Post a comment

0 Comments