पैठण- दिव्यांग युडीआयडी कार्ड वाटप कार्यक्रम.

पैठण (विजय खडसन):- आज पैठण पंचायत समिती सभागृहात आज  दिव्यांग युडीआयडी कार्ड वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
दिव्यांगांची वैश्विक ओळख म्हणून गणले जाणारे व दिव्यांगांना सर्व योजनांसाठी उपयोगी पडणारे स्वावलंबन कार्ड अर्थात युनिक कार्ड देण्याची योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. 
पैठण तालुक्यातील जवळपास सात हजार पेक्षा जास्त  दिव्यांगांना कार्ड देण्याचा कार्यक्रम रोहयो व फलोत्पादन मंत्री श्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते ठेवण्यात आला होता. 
पंचायत समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यासह शिवसेनेचे अनेक सरपंच ,पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.  

Post a comment

0 Comments