पुलावरूनच आमची विचारपूस काय करता?; नासलेली पिकं घेऊन शेतकरी मुख्यमंत्र्यांना भेटले

सोलापूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अतिवृष्टग्रस्त सोलापूरच्या दौऱ्यावर आले आहेत. मुख्यमंत्री येणार म्हणून अतिवृष्टीने पिचलेल्या शेतकऱ्यांनीही मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी धाव घेतली. 
सोयाबीन, तूर आणि कांद्याची नासलेली रोपं घेऊनच शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत बोरी नदीवरील पुलावरून आमची विचारपूस काय करता? आमच्या शेतात, वस्तीत येऊन पाहणी करा, अशी सवालवजा विनंतीही शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सकाळीच सोलापूर येथील सांगवी खुर्दला पोहोचले. या भागात पाऊस झाल्यामुळे चिखलाचं साम्राज्य पसरलं आहे. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर न जाण्याचा सल्ला देत बोरी नदीवरील पुलावरच शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांची गाऱ्हाणी ऐकण्याचा सल्ला दिला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुलावरूनच शेतकऱ्यांचा संवाद साधला.

Post a comment

0 Comments