सुप्रीम कोर्टात नोकरीची सुवर्णसंधी

नवी दिल्ली :- कोरोनाच्या संकटकाळात अनेकांना नोकऱ्या गमावण्याची वेळ आली. पण आता देश अनलॉकच्या प्रक्रियेत असून नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होत आहे. भारतीय सर्वोच्च न्यायालयात (SCI) नोकरी करण्याची उत्तम सुवर्णसंधी आहे. सुप्रीम कोर्टामध्ये शाखा अधिकारी (Branch Officer) आणि कनिष्ठ न्यायालय सहाय्यक (Junior Court Assistant) च्या पदासाठी भरती सुरू आहे. 

महत्त्वाची माहिती अशी की, या पदांसाठी विज्ञान शाखेचे उमेदवार अर्ज करू शकतात. बीई किंवा बीटेक (BE/BTech) आणि कंप्यूटर शास्त्रात पदव्युत्तर पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. तर ०६ नोव्हेंबर २०२० ही या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Post a comment

0 Comments