देश व राज्यातील बौद्धलेणी व विहारांचे संवर्धन व जतन करण्याच्या मागणीसाठी बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्कतर्फे सोयगावच्यातहसील कार्यालयाला निवेदन.....प्रतिनिधी / सोयगाव
देशातील व राज्यातील बौद्ध कालीन लेण्या,स्तूप, विद्यापीठ व विहारांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्याच्या मागणीसाठी सोयगाव येथे तहसील कार्यालय येथे सोमवारी (ता.१२) संयोजक प्रताप पाटील यांच्या नेत्तुत्वात निवेदन देण्यात आले.
बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क हे गैर राजकीय संघटन असून ते बौद्ध लेण्या,स्तूप,यांचे संवर्धन करते, बुलढाणा जिल्ह्यातील भोन, उस्मानाबाद मधील तेर,नागपूर मधील अडम स्तूप, भंडारा मधील पवनी बुद्ध स्तूप, पुण्यातील जुन्नर लेणी,देहूरोड येथील बुद्ध विहार,अकोला जिल्ह्यातील पातूर लेणी, नाशिक येथील त्रिशर्मी लेणी,कारले येथील बुद्ध लेणी,नालासोपारा येथील बुद्ध स्तूप व लेणी नष्ट होत आहे. 
याकडे पुरातत्व खात्याने दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे बौद्ध अवशेष षड्यंत्र पूर्वक नष्ट केल्या जात आहे. या सर्व लेण्यांचे संवर्धन व व जतन करण्यात यावे, अशी मागणी बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्कतर्फे    केंद्र व राज्य सरकारकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.हे निवेदन सोयगाव तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार सतीश देशमुख, नायब तहसीलदार शेख, व नायब तहसीलदार नाना मोरे यानी स्वीकारले.
या वेळी संयोजक प्रताप पाटील, राहूल सपकाळ, निलेश हिवाळे, संदीप घोडेस्वार,संघपाल सोनवणे, भारत पगारे, रविंद्र मनगटे, दिगंबर राठोड,व जेगालाल जयस्वाल यांची उपस्थिती होती.

 

Post a comment

0 Comments