कांद्याचे दर वाढले म्हणून बोंबलू नका, परवडत नसेल तर लसूण, मुळा खा : बच्चू कडू

अमरावती : देशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कांद्यानेसुद्धा सर्वसामान्यांच्या डोळ्यांत पाणी आणलं आहे. कोरोनामुळे आर्थिक अडचण त्यात अस्मानी संकट आणि वाढलेली महागाई यामुळे नागिरक चिंतेत आहेत. अशातच ‘कांद्याचे दर वाढले म्हणून बोंबलू नका. जर परवडत नसेल तर लसूण आणि मुळा खा’ असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे. ते अमरावतीमध्ये बोलत होते. 

केंद्र सरकारने इराणमधून नुकताच कांदा आयात केल्याने संपूर्ण देशासह राज्यात कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले. मात्र, कांद्याचे भाव वाढले म्हणून सर्वसामान्य माणसाने बोंबलू नये असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे. तर कांदाचे भाव वाढले पाहिजे कारण ७० वर्षाचा अनुशेष आहे. ज्यांना कांदा परवडत नसेल त्यांनी मुळा, लसूण खावा असं बच्चू कडू म्हणालेत.

Post a comment

0 Comments