लाच घेणारा तलाठी व खासगी सहकारी एसिबी च्या जाळ्यात वैजापूर(प्रतिनिधी/राहुल त्रिभुवन) : 

वडीलोपार्जित जमिन नावे करण्यासाठी खाजगी सहकारी सह लाचलुचपत विभागाने सापळा रचून लाच घेताना पकड़ले असून ताब्यात घेतले आहे    


जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील पालखेड येथील तलाठी जगदीश मुदिराज यांनी वडिलोपार्जित जमीन नावावर करण्यासाठी एका  शेतकऱ्याकडून तीन हजार रुपयांची लाच तलाठी सजा कार्यालय दहेगाव या ठिकाणी खाजगी सहकार्या मार्फत घेताना लाचलुचपत प्रतिबंध पथकाने रंगेहाथ पकडले.  दहेगाव तलाठी कार्यालय परिसरात ही कारवाई करण्यात आली असून  यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वुत्त असे की, वैजापूर तालुक्यातील दहेगाव येथील तक्रारदार शेतकरी यांनी वडिलोपार्जित शेतजमीन नावावर करायची म्हणून  संबंधित तलाठी यांनी 5000 रुपये लाचेची मागणी केली तदनंतर त्यांच्यात तडजोड होऊन 3000 रुपये देण्याचे ठरवले  परन्तु  लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदारानी लाचलुचपत प्रतिबंध विभाग औरंगाबाद यांच्याकडे तक्रार दिली. दिनांक 7 ऑक्टोबर बुधवार सकाळी सापळा रचून मागणी केल्याप्रमाणे खाजगी सहकारी मार्फत रुपये 3000 स्वीकारल्यानंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.यात तलाठी जगदीश पुरुषोत्तम मुदिराज व खाजगी सहकारी प्रविण नवनाथ शिंदे .
 याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम पोलीस ठाणे वैजापूर , औरंगाबाद ग्रामिण येथे   सुरु आहे. ही कारवाई लाचलुचपत पथकाचे प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ अनिता जमादार,पोलीस उपअधीक्षक गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी केली आहे त्यांना पोलिस नाईक बाळासाहेब राठोड,रवींद्र अंबेकर, राजेंद्र सिनकर व चालक पोलीस शिपाई बागुल यांनी मदत केली.

Post a comment

0 Comments