पैठण येथे युवक काँग्रेसच्या वतीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्या पुतळ्याचे दहनं


पैठण (प्रतिनिधी विजय खडसन)-
पैठण युवक काँग्रेस च्या वतीने उत्तर प्रदेश येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेच्या पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी हाथरस इथे गेले असता उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी राहुल गांधी यांना धक्का बुक्की केली याच्या निषेधार्थ पैठण युवक काँग्रेसच्या वतीने नेहरू चौक येथे उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांचा पुतळा दहन करून उत्तर प्रदेश सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला, या प्रसंगी योगी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. निषेधाच्या प्रसंगी पैठण काँग्रेसचे शहराध्यक्ष हसनोद्दीन कट्यारे, नगरसेवक अजित पगारे, युवक शहराध्यक्ष योगेश शिपनकार, कल्याण मगरे, इर्शाद खान, अज्जू कट्यारे, आशिष पवार, अफरोज कट्यारे, तालिब बोहरी, मुखीम कट्यारे,सोनू पागरे, जावेद शेख, कबीर पठाण, अमीर कट्यारे, जुनेद गाजी ,इत्यादी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments