विनापरवाना खोदकाम पडले महागात गंगामाई कन्स्ट्रक्शन ला नोटीस.
वैजापूर, दि २६. रविवार :  गंगामाई कन्स्ट्रक्शन कंपनीला विनापरवाना ६० ब्रास मुरुम खोदकाम करणे चांगलेच महागात पडले आहे.नवनियुक्त तहसीलदार राहूल गायकवाड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गौण खनिजाची दंडात्मक कारवाईचा दणका गंगामाई कन्स्ट्रक्शन कंपनीला दिला.महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ ( ७) नुसार गौण खनिज काढणे व हलवल्याबद्दल  बाजारभावा प्रमाणे ४ लाख ३२ असा पाचपट दंड तसेच जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्या परिपत्रकानुसार वाहनावर (पोखलँन) ७ लाख ५० हजारांची दंडात्मक रक्कम का आकारण्यात येवू नये अशीकारणे दाखवा नोटीस काढून संबधिताना २४ तासात लेखी खुलासा सादर करण्याची सूचना दिली.दरम्यान परस्पर अनाधिकृतरित्या गौण खनिजाचे उपसा करणा-या मफियात हया कारवाई मुळे मोठी खळबळ उडाली होती. गंगामाई कन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत येथे
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ काम चालू आहे.या कामासाठी खंडाळा शिवारातील एका गटातून पोकलेन यंत्राच्या मदतीने मुरुमाचा अवैध उपसा सुरु असल्याची तक्रार भाजपचे कैलास पवार यांनी तहसिलदार राहुल गायकवाड यांच्या कडून नियमाप्रमाणे कारवाई करण्याची मागणी केली. त्यानुसार तहसीलदार गायकवाड यांनी मंडळाधिकारी आर. एस.तोतला यांना घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्याचे  दिले होते. मंडळ अधिकारी तोतला यांनी या ठिकाणी जावून पाहणी केली असता गट क्र.५२ मधून अनधिकृतपणे मुरुमाचा उपसा एक पोकलेन यंत्र करत होते. तोतला यांनी यंत्रचालक व तेथे असलेल्या इरफान यांच्याकडे मुरुमाच्या रॉयल्टी अथवा परवान्याबाबत विचारणा केली. मात्र त्याच्याकडे कोणतीही परवानगी नसल्याचे त्यांनी तोतला  यांना सांगितले. सद्या राष्ट्रीय महामार्ग क्र.७५२ एचच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असून ते गंगामाई कन्स्ट्रक्शनकडे आहे. त्या सुरु असलेल्या कामाला हा मुरूम वापरला जात असल्याचे तोतला यांना या ठिकाणी असलेल्या कर्मचा-यांनी सांगितले. तोतला यांनी छापा टाकण्यापूर्वी तेथून हायवा (क्र. एम.
एच. २० इ.जी.८१९९) व इतर दोन अशा एकूण तीन हायवा फरार झाली असल्याचे कोल्हीच्या कोतवाल व्ही.एम.मोरे यांनी सांगितले. त्यामुळे तोतला यांनी मुरुमाची वाहतूक करणारे तीन हायवा फरार झाल्या आहेत. तसेच उपसासाठी सुरु असलेले पोकलेन यंत्र जप्त केले आहे. शिवाय या ठिकाणाहून अंदाजे ५० ते ६० ब्रास मुरूम उपसा झाल्याचा तहसील कार्यालयात कारवाई करिता सादर केला होता.दरम्यान गंगामाई कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक वसंत खडके यांनी संबधित शेतक-याची संमती घेऊन प्रक्रिया केली होती असे त्यांनी सांगितले.

Post a comment

0 Comments