पाणी पिण्याच्या बहाण्याने रिक्षा थांबवली, प्रवासी महिलेला बेशुद्ध करुन लुबाडलं

मुंबई : रिक्षातून प्रवाशांना लुबाडणाऱ्या आरोपीला गोरेगाव पूर्वच्या आरे पोलिसांनी अटक केली आहे. रिक्षाचालक आरोपीचं नाव ओमप्रकाश तिवारी (वय ४५) आहे. तर या कामात त्याला सहकार्य करणाऱ्या त्याचा सहकारी संजीव मिश्रा (४८) या इसमालादेखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत 

आरे पोलिसात ७ मार्च २०२० रोजी एका महिलेने याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. या महिलेने मीरा रोड येथून कुर्ला टर्मिनस जाण्यासाठी रिक्शा पकडली होती. त्यावेळी रिक्षाचालक ओमप्रकाश मिश्राने आरे कॉलनी येथे पाण्याची तहान लागल्याचे कारण देत रिक्षा थांबवली.

रिक्षा चालकाने गोडबोलून महिलेला कोल्ड्रड्रिंक प्यायला लावलं. त्यामध्ये त्याने बेशुद्ध करण्याचं औषध मिळवलं होतं. रिक्षाचालक महिलेला बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर सोडून गेला. याशिवाय त्याने महिलेचा मोबाईल, बॅगेतील सर्व पैसे घेऊन तो लंपास झाला.

Post a comment

0 Comments