भाजपचा एकही आमदार खडसेंच्या संपर्कात नाही : प्रवीण दरेकर

सातारा : भाजपचा एकही आमदार एकनाथ खडसेंच्या संपर्कात नाही. ते कालपर्यंत पक्षात होते, त्यामुळे आमदार संपर्कात होते. फडणवीस कसे काम करतात हे माहिती असताना इतर आमदार त्यांच्यासारखी राजकीय भवितव्याची आत्महत्या का करेल,” असा सवाल भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
 भाजपमधील १० ते १२ आमदार संपर्कात असल्याचा दावा केला होता. याबाबत प्रवीण दरेकरांनी विचारले असता त्यांनी खडसेंवर टीका केली.
भाजपाचा एकही आमदार खडसेंच्या संपर्कात नाही. कालपर्यंत ते पक्षात होते म्हणून आमदार त्यांच्या संपर्कात होते. भाजपाचे भविष्य सर्वांना माहित आहे. दीर्घकाळ नेतृत्व करणारा एवढा मोठा पक्ष आहे. केंद्रात मोदी आणि राज्यात फडणवीस काम कसे करत आहेत हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे इतर कोणता आमदार त्यांच्यासारखी राजकीय भवितव्याची आत्महत्या करेल,” असा सवाल प्रवीण दरेकरांनी विचारला.

Post a comment

0 Comments