अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये येण्यास इच्छुक आहेत - जयंत पाटीलस्व. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून गेली तीन दशके भाजपचे नेतृत्व करणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचा त्याग केला आहे. त्यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. म्हणून येत्या २३ ऑक्टोबर रोजी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे अस जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

एकनाथ खडसे यांच्या रुपाने एक अभ्यासू नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळाले आहेत. त्यांच्या अनुभवाचा पक्षाला नक्कीच फायदा होईल. मागील काही वर्षांपासून भाजपमध्ये खडसे साहेबांवर अन्याय होत होता. त्याला आता वाचा फुटली आहे. 

अनेकांना आता विश्वास बसू लागला आहे की भाजप राज्याचा, देशाचा विकास करू शकत नाही. अनेक माजी आजी आमदार, नेते आमच्या संपर्कात आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये येण्यास इच्छुक आहेत. योग्य वेळी नावे जाहीर केली जातील. त्यांचे पक्षप्रवेश रात्रीच्या अंधारात न होता दिवसाढवळ्या होतील असही त्यांनी म्हंटल आहे..
 

Post a comment

0 Comments