मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना पत्र

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या साठवणूक क्षमतेबाबत मागणी करणारं पत्र लिहिलं आहे.  कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी कांदा साठवणूक मर्यादा ही २५ मेट्रिक टनावरून १५०० मेट्रिक टन इतकी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे.

केंद्र शासनाने २९ ऑक्टोबर २०२० च्या सुचनेप्रमाणे एपीएमसीतील कांदा खरेदीच्या दिनांकापासून पॅकेजिंगसाठी ३ दिवसांचा कालावधी दिला आहे. हा कालावधीही खुप कमी असून तो सात दिवसांचा करण्यात यावा, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे केली आहे.

Post a comment

0 Comments