सुडापोटी फडणवीसांच्या चौकशीचा घाट, शिवसेनेच्या मंत्र्यांचीही चौकशी करा- आठवलेंची मागणी

मुंबई : सुडापोटी देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्याचा घाट महाविकास आघाडीने घातला आहे.चौकशी करायचीच असेल तर मग शिवसेनेच्या मंत्र्यांचीही करा, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.  

रामदास आठवले म्हणाले की, राज्य सरकारने सुडापोटी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीचा घाट घातला आहे. चौकशी करायचीच असेल तर त्यावेळी संबंधित मंडळात असलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांचीही चौकशी करा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुडाचं राजकारण मात्र करु नये.


Post a comment

0 Comments